Sunday, 23 September 2018

गब्बर का रिटेल अलायन्स




'गब्बर' हे खलनायकी नांव कोणी व्यवसायात वापरेल का? 

नाही ना? उगाच, लोकांना नांवें ठेवायला कारण सापडायला नको. या भावनेतुन कोणीही स्वत:ला 'गब्बर' म्हणवुन घेणार नाही.
पण काय आहे ना कि,  सगळेच असे भिऊन व्यवसाय करणारे नसतात. वेगळी वाट निवडून तीवर वाटचाल करण्याचं स्वप्न आणि सामर्थ्य असणारे प्रत्येक बाबतीत वेगळेपण जपतात.

'Retailware' या Retail व्यवसायासाठी उपयुक्त अशा,  अत्यंत ग्राहकप्रिय सॉफ्टवेअरचा रचनाकार 'अजित थदानी', हा असाच एक यडचॅप माणूस स्वत:ला 'गब्बर' म्हणवुन घेतो. त्याच्या व्हिजिटींग कार्डावर Ajit Thadani, CEO, गब्बर, Retailware Softech Pvt LTD. असंच छापलंय चक्क.

तुम्ही त्याला भेटलात ना कि पटेलच तुम्हाला की 'आदमी सचमुच गब्बरदिल ईन्सान है'. का, ते पुढं सांगतोच, पण आधी थोडं 'गब्बर' विषयी जाणुन घेऊयात ना.

इंजिनिअरिंग, एमबीए, झाल्यावर हा सरळ वडिलांच्या बरोबर व्यवसाय करायला लागला. उत्तम चाललं होतं पण वेगळं, स्वता:चं काहीतरी करायची अंत:प्रेरणा स्वस्थ बसू देत नव्हती. सॉफ्टवेअर उद्योगाचा सूर्योदय होत होता आणि याला संधी दिसली. Retail दुकानांना लागणारे सॉफ्टवेअर बनविण्याची. मग अभ्यास सुरू झाला. चक्क एका किराणा दुकानात तासनतास बसुन हा व्यवसाय कसा चालतो आणि त्याचं सॉफ्टवेअर बनविण्यासाठी काय केलं पाहिजे, त्यात काय-काय सोयी असायला पाहिजेत असं सगळं समजावून घेतलं आणि त्याच  'सुराणा कॉर्नर' या दुकानात बसुन Retailware हे सॉफ्टवेअर लिहिलं. हे म्हणजे, युध्दभूमीवर तोफांचा कारखाना काढण्यासारखंच कि हो!  पण अशाच अफलातून प्रयोगांनाच यश मिळतं ना. तसंच झालं. आज Retail Billing Software मध्ये Retailware चं नांव आदरानं घेतलं जातं. 'गल्ला छोडो आगे बढो' (आता बोला) ही  टॅग लाईन असलेलं हे सॉफ्टवेअर भारतातील २२ पेक्षा जास्त राज्यातील आणि अॉस्ट्रेलियातील दुकानदार वापरत आहेत. यामागे 'गब्बर'चे आणि त्याच्या सहकार्यांचे अपार कष्ट आहेत. आपल्या ग्राहकांना उत्तम तेच द्यायचं ही तळमळ आहे. 
आज हेच सहकारी त्याच्या कंपनीचे भागधारक देखील आहेत. ही सामाजिक जाणीव, हे 'गब्बर' चं आणखी एक वैशिष्ट्य. याच जाणिवेतून तो नगरच्या ख्यातनाम 'स्नेहालय' शी स्थापनेपासून जोडलेला आहे.

Retail Alliance-एक अफलातून योजना

सामाजिक भान असलेला उद्योजक केवळ स्वत: यशस्वी होण्यासाठी काम करत नसतो तर आपल्याबरोबर समाजातील घटकांना देखील पुढे घेऊन‌ जाण्याचा प्रयत्न करतो.‌ Retail Alliance द्वारा 'गब्बर'चादेखील हाच प्रयत्न आहे. Retail उद्योग वाढतोय, या उद्योगात अपार संधी आहेत. या संधीचा फायदा तरूणांनी घ्यावा, असं त्याला वाटतंय. रिटेल व्यवसायांसाठी लागणारी सॉफ्टवेअर तर तो पुरवतोच पण रिटेल व्यवसायाला लागणाऱ्या इतर सुविधा म्हणजे बारकोड व सामग्री, Retail Inventory Audit आणि व्यवसाय वृध्दी साठी मार्गदर्शन या सेवा. या देणारे 'पिनाको इंडिया', 'स्टॉकटॅली आणि 'Your Retail Coach', यांना बरोबर घेऊन एक भव्य स्वप्न तो बघतोय. Retail Alliance मार्फत या सेवा देशभरातील रिटेल व्यावसायिकांना मिळतील. यासाठी त्याला साथ हवीय ती गावोगावच्या 'तरुणाईची'. व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांना आपल्या समृध्द अनुभवाद्वारे मार्गदर्शन देऊन आणि त्यांना Retail Allinace  चे Channel Partner करून घेण्याची योजना आहे. Channel Partnerना आपल्या गावातल्या रिटेल ऊद्योगांचा सेवा-पुरवठादार होता येईल तेही एकाचवेळी 'चार' आवश्यक सेवांचे प्रतिनीधी होऊन. हे म्हणजे एकदम 'चौपट' ताकद आल्यासारखं आहे ना. बरं या सेवा वारंवार लागत असल्याने 'एक बार बेचो और बारबार कमाओ'. आहेना डोकॅलिटी! 

उगाच नाही, 'गब्बर' नांव लावत तो!

तुम्हांला भेटायचंय आणि Channel Partner व्हायचंय? अहो मग सरळ फोन करा कि 98509 33654 या नंबरवर. वाट कसली बघताय? संधी काय वारंवार येते थोडीच?

श्रीकुल
२१ सप्टेंबर २०१८.

कानसेन-घराणं पुणे

 संगीतक्षेत्रात घराण्यांचा मोठा बोलबाला अजुनही आहे. प्रत्येक घराण्याचं आपलं असं एक गायकी वैशिष्ट्य आहे. किंबहुना ही वैशिष्ट्यविविधता हाच दोन...