सरत्या वर्षाच्या शेवटीशेवटी मला सातारा येथील डॉ. जे. डब्ल्यु. आयरन प्रशालेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमास हजर राहण्याची संधी मिळाली. यांत माझं कर्तुत्व इतकंच कि या शाळेचे संस्थापक डॉ. आयरन हे माझे आजेसासरे. माझी पत्नी स्मिता हिचे आजोबा. अतिशय ह्रुद्य असा कार्यक्रम होता. गेल्या पन्नास वर्षांत येथुन शिकुन गेलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळविते झाले. आपापल्या आवडीच्या क्षेत्रांत नामांकित असलेले, आयुष्यांतील गोडतिखट अनुभवांनी शहाणपण आलेले सर्वजण अक्षरशः मूल होऊन बागडत होते. आपल्या आवडत्या आणि नावडत्या देखिल शिक्षकांच्या पाया पडत होते. त्या वयोव्रुद्ध शिक्षकांच्या थकलेल्या डोळ्यांत आपलं हरवलेलं बालपण शोधीत होते. आपल्या पदव्यांच्या, मानमरातबांच्या झुली उतरवुन ,काही तासांपुरते का होईना पुन्हां शाळकरी झाले होते. अक्षरशः बागडत होते. जणुकाही मधली काही वर्षे कालपटलावरुन पुसली गेली होती. स्मरणरंजनाच्या डोहांत आकंठ बुडालेल्या त्या जाणत्यांच्या अजाण गर्दीला पाहुन माझ्याही डोळ्यांच्या कडा पाणवत होत्या. नकळत माझी शाळा, शाळूसोबती यांच्या आठवणींचे कढ मनांत दाटुन येत होते.
खरंच, शाळा ही किती अविस्मरणीय असते नाही? आठवणी अशा म्हातारीच्या पिसासारख्या उडायला लागल्या कि 'माझा न मी राहिलो' अशी अवस्था होते.
हि कालवाकालव मनांत चालु असतांना एक अनादि प्रश्न मनांत उफाळुन येत होता. तो म्हणजे, आपण शाळेत जातोच कशाला? मला माझ्या बालपणी जेंव्हा शिशुवर्गात पाठविण्याचे अनेक केविलवाणे प्रयत्न माझ्या पालकांनी केले. तेंव्हापासुन हा प्रश्न माझ्या मनांत रुंजी घालतो आहे. अर्थात, वयाच्या प्रत्येक टप्प्यांवर या प्रश्नाची वेगवेगळी उत्तरं मिळत गेली.
"शिकला नाहिस तर आयुष्यभर दुसर्याच्या घरची भांडी घासावी लागतील" हे आद्य उत्तर जरा भितीदायकच होते. एखाद्या दिवशी चुकुन जरी शाळा बुडाली तरी डोळ्यांसमोर भांड्यांचा ढीग येई. गोवर, कांजिण्या, फ्लू,टायफॉईड असल्या रोगांनी हा प्रसंग सुरुवातीच्या काळांत तसा वारंवार यायचा. अर्थात भांडी घासण्याचा आणि शिक्षणाचा काहीएक संबंध नसतो हे लग्न झाल्यावर चांगलेच उमगले म्हणा.
"खुपखुप नवीन शिकायला मिळतं शाळेत". हि निव्वळ अफवाच असते हे कळेस्तोवर कॉलेजमध्ये पोहोचलो होतो.
"अरे, नवीन छानछान मित्र मिळतात शाळेत". मित्र मिळाले पण ते सगळेच छानछान होते हे कबूल करण्यांऐवजी मी "आमच्या हिच्या हातची कारल्याची भाजी अगदी साखरेईतकी गोड लागते" या वाक्यावर विश्वास ठेवीन.
"नुसता उच्छाद मांडलाय या कार्ट्यानं. शाळा असली कि बरं असतंय. तेवढीच चार घटका विश्रांती तरी तरी मिळते याच्यापासुन" हे उत्तर आहे कि पालकांची प्रांजळ कबुली?
"शाळेत गेलं ना कि नवनवीन खेळ शिकता येतात". क्रिकेटशिवाय दुसरा खेळ असु शकतो यांवर जरासुद्धा विश्वास नसलेल्या मला तो शिकण्यांसाठी शाळेत जायची गरजच नव्हती. शाळेचा आणि खेळाचा अर्थाअर्थी संबंध नसतो हे तर अनेक जान्यामान्या आजीमाजी खेळाडूंनी सिद्ध करुन दाखवलंयच की.
'नवीन ज्ञानाची कवाडं उघडण्यासाठी शाळेत जायचं असतं" हे वाक्य तर केवळ सुविचार म्हणुन ठिक आहे हे ठामपणाने सांगितल्यावर पित्रुदेवांनी त्याहुन अधिक ठामपणे माझ्या पार्श्वभागावर प्रहार केल्याचं आजही आठवतंय. शिक्षेची ही पद्धत ते त्यांच्या शाळेत शिकल्याचे त्यांनी मागाहुन सांगितल्यावर तर माझा शालेय शिक्षण या विषयावरचा विश्वास कायमचा उडाला.
विशेषतः, आजच्या युगांत घरबसल्या ज्ञान मिळविण्याची सोय सर्वसाक्षी ' भगवान वेबदेव' यांच्या कृपेने उपलब्ध असतांना तर शाळेत जाणं हा वेळेचा निव्वळ अपव्यय आहे. हे माझं मत बनत चाललंय. त्यामुळे शाळा तरी कशाला हव्यात?
समोरची ती वय हरवलेली गर्दी, माझ्या मनातला हा कोलाहल. कशाचाच मेळ बसत नव्हता. तेवढ्यांत माझ्या मुलाला डॉ. जे. डब्ल्यु. आयरन म्हणजे त्याच्या पणजोबांचा फोटो दिसला. अनेक विद्यार्थी त्यापुढे नतमस्तक होत होते. अनेकजण त्यांच्या आठवणी सांगत होते. ते पाहुन मुलगा म्हणाला,
" वॉव, बाबा यासाठी जगायचं असतं. आपण गेल्यानंतरही आपली आठवण अशी चिरंतन राहिली पाहिजे." मी चकित झालो.
"तुम्हांला एक गोष्ट सांगतो". असं म्हणुन त्यानं मला एक गोष्ट सांगितली. त्या कथेचा नायक म्रुत्युशय्येवर असतांना त्याच्या मुलाला सांगतो कि,
"तुला ठाऊक आहे का आपण नेमके कधी मरतो?
"जेंव्हा एखादी गोळी सणसणत येऊन आपल्या ह्रदयात घुसते तेंव्हा? नाही."
"जेंव्हा एखादा असाध्य रोग आपल्याला संपवतो तेंव्हा? नाही"
"जेंव्हा प्यालाभर विष आपला कंठ चिरत जळजळत आत उतरतं तेंव्हा? नाही"
"आपण मरतो, जेंव्हा आपण आपल्याच आप्तांच्या विस्मृतीत जातो तेंव्हा"
"हो पण ही गोष्ट आणि हा समारंभ, काय संबंध? मी गोंधळुनच मुलाला विचारलं
"जोवर या विद्यार्थ्यांच्या मनांत आठवणी आहेत तोवर ही शाळा, ती सुरु करणारे 'दादा सर' म्हणजे डॉ. आयरन हे अजरामर नव्हेत काय?" मुलगा उत्तरला.
लख्खकन प्रकाश पडला आणि दुसरा प्रश्न म्हणजे शाळा हव्यातच कशाला याच उत्तर मिळालं. "अशा अनंत आठवणकुप्या तयार करण्यासाठी शाळा हव्यात. 'भगवान वेबदेव' देतात ती माहिती असते निव्वळ, पण शाळा त्या माहितीचं ज्ञानांत रुपांतर कसं करायचं हे सांगतात.
त्या प्रांगणांत जमलेले शेकडो विद्यार्थी आपल्या शिक्षकांचे चरणस्पर्श करायला उतावीळ असलेले पाहुन उमगलं कि ज्या चरणांवर माथा टेकवावासा वाटतो ते वंदनीय चरण शोधण्यासाठी शाळेत जायचं असतं.
मला उत्तरं मिळाली. कार्यक्रमाचा आनंद घेता आला.
असं 'बेगाने शादीमे दिवाना' होण्याचं भाग्य मिळालं.
इतका सुरेख, नेटका कार्यक्रम केल्याबद्दल आणि त्यांत आम्हांला सहभागी होण्याचं सौख्य दिल्याबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक आभार.
श्रीकुल
११/१/२०२०

परिस्थितीने व गरजेने आजपर्यंत अनेक सुजाण, कलाकार होता होता राहिले. काही अभिनेते झाले, काही नेते. आपल्या याच गोष्टी मुळे आम्ही लोक इतके दिवस एका उत्तम लेखकाला मुकलो होतो. मलाही असे वाटते की मला लिहिता येते. पण असं वाटणं जितकं सोपं तितकं ते अवघड हे आपल्या सोप्या वाटणाऱ्या लेखनाने कळले, पुन्हा सिद्ध झाले. वाहते रहा व आम्हाला सुजाण करण्याचा प्रयत्न करत रहा हीच ईश्वर चरणी प्रार्थना..
ReplyDeleteधन्यवाद. नक्की लिहिता राहीन.
Deleteशाळा हे आठवणींचे मोहोळ असते हे शाळा सोडल्यावर अनेक वर्षांनी समजले. वर्ग वगळता इतर ठिकाणी मिळाले ते खरे शिक्षण हे पण ज्ञानच ना!
ReplyDeleteधन्यवाद.
Delete🙏सत्यम् शिवम् सुंदरा🙏
ReplyDeleteशाळेतील मित्रांचे निःस्वार्थ, निर्व्याज्य,निरपेक्ष प्रेम आणि त्याच बरोबर भांडणे, कट्टी आणि बट्टी हे पुढील आयुष्यात जगण्यासाठी उपयोगी पडते.
आव्हानांना तोंड देण्यासाठी ,अपयशाला सामोरे जाण्यासाठी आणि व्यक्तिमत्व घडण्यासाठी शाळा ही समाजाची महत्त्वाची प्रतिकृती आहे.....
आपल्या शाळेमुळे तर आज आपण यशस्वीपणे उभे आहोत,....
तू कार्यक्रमाचे खूप छान आणि यथार्थ वर्णन केलेस. शाळेच्या पुढील कार्यासाठी मनापासून शुभेच्छा🙏
पद्मजा
धन्यवाद.
Deleteफारच सुंदर. सहज आणि ओघवती भाषा.. ललित लेख म्हणतात तो असा... क्या बात है..खरंच एक पुस्तक प्रकाशित कर. Class...
ReplyDeleteधन्यवाद.
Delete