Sunday, 23 August 2020

एकदंतं द्वितीयकम



हे गणराया, तू सुखकर्ता आहेस दुःखहर्ता आहेस पण तूच कर्ताकरविता देखील आहेस.
याहुन महत्वाचं म्हणजे तू मार्गदर्शक आहेस. 'त्वं साक्षादआत्मासी नित्यम', म्हणजे तूच माझा आत्मा आहेस असं मला जाणवतंय. मी पार्थिव तर तू माझ्या गाभ्याशी असलेलं अपार्थिव तत्व.

                                                                 'त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि'.

प्रकाशापासुन प्रकाशाकडे प्रवास करतांना मध्ये 'देह' नांवाचा जो विसावा आहे त्याचा मूलाधार तर तुच आहेस ना रे? माझ्या अंतरात्म्याचा आवाज म्हणजे विवेकबुध्दीरुपी 'श्रीगणेश'. म्हणुनच या अंतरात्म्याचं प्रमाण मानुन केलेली माझी प्रत्येक कृती शुध्द असते.

 

अज्ञानाकडुन ज्ञानाकडे म्हणजेच तिमिरातुन प्रकाशाकडे होणारा प्रवास तुझ्याच तर साक्षीने होतो. नव्हे तूच तर हा प्रवास घडवतोस.

 

हे 'आत्मरुपा' तू असाच पथदर्शक होऊन रहा. माझ्या प्रत्येक विचारात, प्रत्येक उच्चारात, प्रत्येक कृतीत तुझंच अनुष्ठान असुं देत.


 

श्रीकुल
भाद्रपद शु. पंचमी शके १९४२
23/8/2020

2 comments:

कानसेन-घराणं पुणे

 संगीतक्षेत्रात घराण्यांचा मोठा बोलबाला अजुनही आहे. प्रत्येक घराण्याचं आपलं असं एक गायकी वैशिष्ट्य आहे. किंबहुना ही वैशिष्ट्यविविधता हाच दोन...