हे सिंदुरवदना विद्याधीशा, ज्याच्या केवळ स्मरणानेच मनोकामना पूर्ण होतात त्या गणाधीशा तुला नमन.
तुझं नित्य स्मरण मला राहो कारण तुला आठवतांना तुझं ते मोहक रुप अंतर्चक्षुंसमोर येतं. मन हरखुन जातं.
गजशुंडेला मुख म्हणुन मिरवुन तू सहचर्याचं अद्भुत रुप दाखवतोस ती सहचर्याची भावना आणि प्रेरणा माझ्यामध्ये निर्माण होऊ देत.
चराचराविषयीची हि आप्त भावना हा माझाही स्थायीभाव व्हावा यासाठीच तू हा अवतार धारण करतोस ना?
हे विशालमस्तका, तू माझ्या शब्दांतुन, कृतीतुन, विचारांतुन तर अव्याहतपणे व्यक्त होत रहाच, पण इतरेजनांशी माझा होणार्या व्यवहाराचं तु अनुष्ठान व्हावंस.
होशील ना रे?
श्रीकुल
भाद्रपद शु. सप्तमी शके १९४२
25/8/2020

चांगली विचार मालिका चालू केलीस.छान उपक्रम आहे,आसाच चालू ठेव .या तुझ्या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा
ReplyDeleteगजमुख 🙏🙏
ReplyDeleteलय भारी
ReplyDeleteÑice thought of universal brotherhood expressed through a novel concept.
Keep writing