Tuesday, 1 September 2020

एकादशं गणपतिं






 हे गणाधिपा, वत्सला तुझ्या चरणकमलांवर माझं मस्तक टेकवितांना

अपूर्व अनुभूती प्राप्त होते आहे रे!


दशदिसांच्या उत्सवात माझ्या अस्तित्वाच्या दशदिशा उजळुन निघाल्या आहेत. चोहिकडे मला 'गणेशप्रभा' फाकलेली दिसते आहे. मी अंतर्बाह्य मोहरुन गेलो आहे. हा माझ्या अंगणी फुललेला 'गणेशऋतु' अक्षय रहावा.
आज उत्सवमूर्तीचं विसर्जन.
आज असं का करेनास कि विसर्जन माझंच व्हावं. जाणीवांची जळकट कोळिष्टकं विरून जावीत आणि नेणीवतेचं निरभ्र आकाश व्हावं खुलं.
आपुल्याच मरणाचा अनुपम्य सोहळा बघुं देत मला. मी-तू पणाची बोळवण व्हावी.
अंतर्यामी उरावं केवळ लखलखतं 'गणेशतत्व'.

तुझ्या रुपवर्णनांत गुंग असणारा 'मी' हलकेच विरघळुन जावा तुझ्याच स्वरुपात.
असं दिव्य एकरुपत्व अनुभवावं या आत्म्यानं.

गं गणाधिपतये नमः
गं गणाधिपतये
गं
गं
गं

इतकीच 'श्रीशिल्लक' रहावी.


श्रीकुल
भाद्रपद शु. चतुर्दशी शके १९४२
1/9/2020

3 comments:

  1. 'श्रीशिल्लक' छान शब्द

    ReplyDelete
  2. ‘गणेशऋतू’ नावीन्यपूर्ण शब्द 🙏

    ReplyDelete
  3. दशदिसांच्या उत्कृष्ट काव्या नंतर एक समर्पक शेवट श्री प्लीज कीप रायटिंग

    ReplyDelete

कानसेन-घराणं पुणे

 संगीतक्षेत्रात घराण्यांचा मोठा बोलबाला अजुनही आहे. प्रत्येक घराण्याचं आपलं असं एक गायकी वैशिष्ट्य आहे. किंबहुना ही वैशिष्ट्यविविधता हाच दोन...