Monday, 24 August 2020

तृतीयम कृष्णपिंगाक्षं



हे गणनायका सकळकलाधिपते, माझ्या सर्व क्षमतांसह मी तुला वंदन करतो.

माझ्या अस्तित्वाचा मूळ गाभा तूंच आहेस पण अवचित मला या सत्याचा विसर पडतो. तू माझ्या आंत तर आहेसच पण बाहेरही तूंच तर आहेस. तू सर्वव्यापी आहेस. म्हणुनच 'सर्वतो मां पाहि पाहि समंतात. माझी दृष्टी जाईल तेथे तेथे तूंच आहेस.

हि माझी दृष्टी तुझ्या कृपेने आंत वळलेली असु देत. तुझ्या मंगलमय अस्तित्वाच्या प्रखरतेने माझ्यातल्या अमंगळाचा नाश होऊ दे.

खरंतर असं करशील का? माझी दृष्टीच 'गणेशमय' होऊ देत. सर्वत्र मला मग मंगलप्रभाच दिसु लागेल.

माझ्या वाचेमध्ये तू, माझ्या विचारांमध्ये तू, माझ्या दृष्टीमध्येही तू असशील तर मीच 'मंगलमूर्ती' व्हावं हे तुझंच स्वप्न साकार होईल.


श्रीकुल
भाद्रपद शु. षष्ठी शके १९४२
24/8/2020

4 comments:

  1. गणेशमय 🙏🙏🙏

    ReplyDelete
  2. फारच मस्त गणपतीचे 3 दिवस खूप सुंदर वाचायला मिळाले

    ReplyDelete

कानसेन-घराणं पुणे

 संगीतक्षेत्रात घराण्यांचा मोठा बोलबाला अजुनही आहे. प्रत्येक घराण्याचं आपलं असं एक गायकी वैशिष्ट्य आहे. किंबहुना ही वैशिष्ट्यविविधता हाच दोन...